शिमला मधील पर्यटन स्थळे | Places to visit in Shimla in Marathi.

Spread the love

 Places to visit in Shimla in Marathi.भारतातील हिमाचल प्रदेश हे राज्य “देवभूमी” म्हणूनही ओळखले जाते.शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी असून उत्तर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून २२०० मीटर उंची वर वसलेले शिमला भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. ब्रिटिश काळामध्ये शिमला ही  भारताची  “ग्रीष्मकालीन राजधानी” म्हणून प्रसिध्द होती.शिमला आपल्या सदाहरित निसर्ग सौंदर्याने व आल्हाददायी वातावरणामुळे देश-विदेशातील पर्यटकांबरोबरच नवविवाहित युगुलांसाठी “हनिमून डेस्टीनेशन” म्हणून ही प्रसिध्द आहे.शिमला पर्यटनासाठी एकदा आलेला पर्यटक या ठिकाणी पुनःपुन्हा येतो.कारण निसर्ग सौंदर्या बरोबरच ब्रिटीश कालीन बांधकाम असलेल्या इमारती,बाजारपेठ, मंदिरे व स्थानिक जनजीवन यांच्या अनुभवाने पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात.जर तुम्ही शिमला पर्यटनाची तयारी करत असाल तर हा लेख खास तुमच्या साठीच आहे. या लेखात आपण शिमला व परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

शिमला शहराचा इतिहास | History of Shimla in Marathi.

सध्या शिमला शहर ज्या ठिकाणी आहे,त्या ठिकाणी अठराव्या शतकाच्या घनदाट जंगल होते.काही घरे व जाखू मंदिर असे शिमला शहराचे स्वरूप होते.काली मातेचे रूप असलेल्या शामला देवी ची स्थापना या ठिकाणी करण्यात आली व शामला देवी वरून हे ठिकाण ‘शिमला’ म्हणून ओळखले जाऊ लागले.इ.स. १८०६ पर्यंत नेपाळ चा राजा भीमसेन थापा याचे राज्य होते.सन १८१४-१६ या काळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने नेपाळच्या राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला.त्यावेळी झालेल्या ‘सुगौली तह’ अंतर्गत नेपाळच्या राजाने एक तृतीयांश भागावर पाणी सोडले.यामध्येच शिमला परिसर ही होता.

सन १८१९ नंतर हळू हळू शिमला ब्रिटीशांच्या वसाहतीने गजबजू लागले.शिमल्याची थंड व आल्हाददायी हवा, हिरवागार निसर्ग,बर्फाच्छादित पर्वत शिखरे,सिल्वर ओक व देवदारची वनराई ब्रिटीश अधिकाऱ्यांना आकर्षित करू लागली.व त्यानंतर शिमला ही भारताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणून प्रसिध्द झाली.

शिमला शहरातील पर्यटन स्थळे :Places to visit in Shimla in Marathi.

Places to visit in Shimla in Marathi.
मॉल रोड

मॉल रोड : मॉल रोड हे शिमला शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मॉल रोड हे शिमला शहराच्या मध्यवर्ती भागात असून एक शॉपिंग हब आहे आणि येथे पर्यटकांना खरेदी साठी अनेक प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट्स, क्लब, बँका, बार,पोस्ट कार्यालय,पर्यटन कार्यालय  इत्यादी आहेत. जग भरातील अनेक प्रकारच्या वस्तू शिमला मॉल रोड इथे मिळून जातात.इथल्या दुकानातील विविध प्रकारच्या वस्तू पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो.शिमला शहराचे विविधांगी दर्शन मॉल रोड वरून होते.सायंकाळच्या वेळी मॉल रोड वरून पायी केलेली भटकंती हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

Places to visit in Shimla in Marathi.

कुफरी: Femous tourist place in Shimla. शिमल्यापासून 16 कि.मी. अंतरावर असलेले कुफरी हे  आईस स्केटिंग आणि स्कीइंग सारख्या हिवाळ्यातील खेळांसाठी प्रसिद्ध आहे.हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्या कोंदणात वसलेले कुफरी हे निसर्ग प्रेमी व  साहसी खेळ प्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे.समुद्र सपाटी पासून २५१० मीटर उंचीवर असलेल्या कुफरी मध्ये अनेक निरीक्षण स्थळे असून हिमालयाची अनेक  विहंगम दृश्ये इथून आपण पाहू शकतो.जर तुम्ही शिमला पर्यटन करण्याची तयारी करत असाल तर.कुफरी या ठिकाणी जरूर जा.

द रिज :Places to visit in Shimla in Marathi. द रिज हा शिमल्यामधील एक रस्ता आहे.जिथून आपण शिमला शहर व आसपास च्या परिसराचा नजारा पाहू शकतो.शिमल्याच्या मॉल रोड च्या टोकाला द रिज हा व्हू पॉइंट आहे.इथून बर्फाच्छादित पर्वत शिखरे पाहणे हा एक अनोखा अनुभव असतो.शिमला पर्यटनाला आलेले पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.इथे पर्यटक व स्थानिक लोकांची कायम गर्दी पाहायला मिळते.पहाडी प्रदेशातील लोकांचे जनजीवन पाहण्यासाठी ही जागा अत्यंत उत्तम आहे.

चाडविक फॉल्स: शिमल्या मधील आणखी एक प्रेक्षणीय स्थळ असणारे चाडविक फॉल्स पर्यटकांची गर्दी असणारे ठिकाण आहे. चहूकडे देवदार व इतर सुचीपर्णी वृक्षांनी वेढलेल्या वातावरणात असलेला हा धबधबा निसर्ग प्रेमी लोकांसाठी पर्वणी ठरतो.पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे सौंदर्य अधिकच बहरते.या धबधब्याकडे जाण्यासाठी वाहनाची सोय उपलब्ध असते.निसर्गरम्य शांत वातावरणात असलेला हा धबधबा शिमल्याला गेल्यानंतर न चुकवण्यासारखा आहे.

जाखू हिल: Jakhu hills Best places to visit in Shimla in Marathi. शिमल्यापासून २ कि.मी. अंतरावर जाखू हिल नावाची टेकडी शिमल्यामधील सर्वात उंच असलेले ठिकाण आहे.याची समुद्र सपाटी पासून उंची ८००० फुट असून या ठिकाणाहून शिमला शहर व चोहोबाजूंची बर्फाच्छादित शिखरे यांचे अद्भुत दर्शन होते.पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात कारण इथे असलेले जाखू मंदिर बजरंगबली हनुमानाला समर्पित असून  हनुमानाचे जुने मंदिर या ठिकाणी आहे. हनुमानाची 108 फूट उंच मूर्ती इथे पाहायला मिळते.

Places to visit in Shimla in Marathi.

शिमला राज्य संग्रहालय: शिमला राज्य संग्रहालयाला हिमाचल राज्य संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते.शिखराच्या उंचवट्यावर असलेले हे संग्रहालय १९७४ मध्ये तयार केले गेले.ब्रिटीश वास्तुकला व विस्तीर्ण मैदान हे इथले आकर्षण आहे.या संग्रहालयात भारताची संस्कृती अत्यंत आकर्षकपणे मांडली आहे.या संग्रहालयात अनेक उत्तमोत्तम पेंटिंग,हस्तकलेच्या वस्तू,मूर्ती पाहायला मिळतात.काही कलाकृती १०० वर्षापेक्षा जुन्या आहेत.या संग्रहालयाने हिमाचल प्रदेश राज्याच्या संस्कृतीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे जी पहाड़ी पेंटिंग्ज, शिल्पकला, पोशाख, ज्वेलरी, कांस्य आणि लाकडी कोरीव कामांमध्ये दिसते.

ख्रिस्ती  चर्च: शिमल्यामधील द रिज या स्थळाजवळ हे चर्च असून याची निर्मिती १८५७ साली करण्यात आली.नक्षीदार झरोखे व कलाकुसरीने युक्त असलेले हे चर्च पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.उत्तर भारतातील ही सर्वात जुनी चर्च आहे. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे.

समर हिल:शिमला शहरातील समर हिल्स ही पर्यटकांची आवडती जागा आहे.मॉल रोड पासून ५ कि.मी.  अंतरावर हे ठिकाण असून पूर्वी हे ठिकाण पॉटर्स हिल म्हणून ही ओळखली जात असे.या ठिकाणी कुंभार लोक मातीची भांडी बनवत असत.इथून शिमला व परिसराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.इथले वातावरण शांत असल्यामुळे महात्मा गांधींनी या टेकडीला भेट दिली होती.शांतता असलेल्या या जागी काही वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात.

तारा देवीः टेकडीवरील हे मंदिर तार्‍यांच्या देवीला समर्पित आहे. कालका-शिमला मार्गावर हे मंदिर असून अत्यंत प्रसिध्द असे हे मंदिर आहे.

धर्मशाला येथील पर्यटन स्थळांची माहिती.

कालका-शिमला रेल्वे प्रवास: Kalka- Shimla toy train information in Marathi.

जर एखाद्यास शिमला येथे जायचे असेल तर कालकापासून सुरू होणारी आणि शिमला येथे संपणारी रेल राईड कधीही चुकवू नये. कालका-शिमला रेल्वे लाईन ही पहाडी प्रदेशातील रेल्वे लाईन असून युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.ब्रिटीश काळात १८९८ मध्ये तयार करण्यात आलेल्या या रेल्वेचा वापर शिमल्याला भारताच्या अन्य शहरांशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी केला गेला.हरियाणा राज्यातील कालका या ठिकाणाहून सुरु होणारी ही छोटी रेल्वे समर हिल्स,सोलन,बरोग,तारादेवी अशी महत्वपूर्ण पर्यटन स्थळे आहेत.या रेल्वे मार्गावर एकूण १०३ बोगदे व ८०० पूल आहेत.हा रेल्वेमार्ग अनेक वळणदार मार्गांचा असून चढाव असल्याने छोटी रेल्वे अत्यंत हळू गतीने मार्गक्रमण करत असते.हा संपूर्ण मार्ग अत्यंत रमणीय असून प्रत्येक पर्यटकाने या रेल्वे ने एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे.

शिमला पर्यटनाचा योग्य काळ : Best time to visit Shimla in Marathi.

शिमल्याचे हिवाळ्यातील तापमान किमान -7 डिग्री सेल्सियस ते जास्तीत जास्त 28 डिग्री सेल्सियस पर्यंत असते. शिमलाचे सौंदर्य पाहण्याचे उत्तम वातावरण म्हणजे उन्हाळ्यात एप्रिल ते जून या काळात असते. मात्र ज्यांना हिमवर्षाव अनुभवायला आवडते किंवा स्कीइंग, स्केटिंग करायला आवडते त्यांच्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी हा उत्तम काळ असतो.

शिमल्या मध्ये कुठे राहावे: Where to stay in Shimla in Marathi.

जर तुम्ही शिमला पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर,शिमल्यामध्ये कमी बजेट पासून जास्त बजेट पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत.तसेच आरामदायी वास्तव्यासाठी अनेक रिसोर्ट शिम्ल्यामध्ये आहेत.या सर्व हॉटेल्स चे आपण ऑनलाईन बुकींग करू शकतो.

शिमल्याला कसे जावे ? How to reach Shimla in Marathi.

शिमला हे भारतातील  प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.शिमला हे देशाच्या इतर शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.

विमानाने शिमल्याला कसे जावे? How to reach Shimla by Flight in Marathi.

शिमल्याला विमानतळ असून शहरापासून २२ कि.मी.अंतरावर आहे.दिल्ली व चंडीगड हून शिमल्याला दररोज विमानसेवा उपलब्ध असते.त्याचबरोबर दिल्ली विमानतळ व चंडीगड विमानतळ हे प्रमुख विमानतळ शिमल्यासाठी जवळचे असून देश-विदेशातील शहरांशी जोडले गेले आहेत.मुंबई वरून शिमल्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध नाही.मुंबई-दिल्ली व दिल्ली-शिमला असा विमान प्रवास करता येईल.

रेल्वेने शिमल्याला कसे जावे? How to reach Shimla by Train in Marathi.

शिमल्याला जाण्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? असा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर,मी नक्कीच सांगेन टॅाय ट्रेन.हिरवागार निसर्ग व बर्फाच्छादित पर्वत शिखरांचा नजरा पाहात नॅऱोगेज  लोहमार्गावरून धावणाऱ्या  छोट्याश्या झुकझुक गाडीने केलेला प्रवास संस्मरणीय असाच असतो. हरियाणा राज्यातील कालका इथून सुरु होणारा हा अनोखा प्रवास शिमला येथे संपतो. दिल्ली वरून कालका इथे येण्यासाठी आपण रेल्वे किंवा बस चा पर्याय निवडू शकतो.

रस्ता मार्गाने शिमल्याला कसे जावे? How to reach Shimla by Road in Marathi.

दिल्ली ते शिमला हे अंतर ३४२  कि.मी.असून चंडीगड ते शिमला हे  अंतर ११२ कि.मी. आहे. दिल्ली च्या काश्मिरी गेट ISBT व चंडीगडच्या सेक्टर ४३  ISBT  इथून शिमल्यासाठी वातानुकुलीत व साध्या बसेस दररोज सुटतात.किंवा खाजगी गाडीनेही शिमला प्रवास याच मार्गाने आपण करू शकतो.

हे ही वाचा :

सारांश : शिमला हे सर्व ऋतू मध्ये पर्यटन करण्यायोग्य स्थळ आहे.विशेषत: नवविवाहित जोडपी आपल्या संसाराची सुरुवात करण्यासाठी शिमला या ठिकाणाला पसंती देतात.तुम्ही जर अजूनही शिमला पर्यटन केले नसेल तर,येत्या काही दिवसात शिमला पर्यटन करण्यासाठी नक्कीच तयारी करा.हा(Places to visit in Shimla in Marathi.) लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा.

टीप: शिमल्यामधील काही पर्यटन स्थळांची माहिती या लेखात दिली आहे.आणखी बरीच पर्यटन स्थळे शिमला परिसरात आहेत.तुम्हाला जर ती माहित असतील तर आम्हाला जरूर कळवा या लेखात त्यांचाही समावेश नक्कीच करू.

2 thoughts on “शिमला मधील पर्यटन स्थळे | Places to visit in Shimla in Marathi.”

Comments are closed.